Wednesday, 5 September 2018

शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाचा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’कार्यक्रम उद्या

            नागपूर, दि. 05 : शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या जिमखाना हॉलमध्ये शुक्रवार, दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 2.45 वाजता ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या ‘सेलीब्रेटींग ए कॉन्फ्युएन्स ऑफ ॲकेडमीया एन्ड वर्ल्ड ऑफ वर्क’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
            कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर तंत्रशिक्षण विभागाचे सह संचालक गुलाबराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल. यावेळी व्हीएनआयटीचे अध्यक्ष व्ही. आर. जामदार, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर थोरात, सिव्हील इंजीनिअरींग विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक तसेच कार्यक्रमाचे समन्वयिका डॉ. राजेश्वरी वानखडे आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
            ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासकीय तंत्रशिक्षण व विविध उद्योजकांमध्ये सामंजस्य करार करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वयिका डॉ. राजेश्वरी वानखडे यांनी केले आहे.
*****

No comments:

Post a Comment