नागपूर दि.27: महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांचे शनिवार, दिनांक 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता नागपूर येथे आगमन व मुक्काम. रविवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता नागपूर येथून अमरावतीकडे प्रयाण करतील. तेथील स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहून सायंकाळी 7 वाजता त्यांचे नागपूर येथे आगमन होईल . रात्री 7.30 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील बैठकीला उपस्थिती त्यानंतर रात्री मुक्काम करतील. सोमवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तींना ते भेटतील. दुपारी 1 वाजता अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची बैठक व दुपारी 3 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासोबत शासकीय विश्रामगृह येथे बैठकीला उपस्थित राहतील . दुपारी 3.50 वाजता लोकमान्य जनकल्याण अल्पसंख्याक संस्था येथे मेळाव्याला उपस्थिती राहून रात्री 8.30 वाजता नागपूर विमानतळ येथून ते मुंबईकडे प्रयाण करतील .
***
No comments:
Post a Comment