नागपूर दि 27 : अखील भारतीय औषधी विक्री संघटनेनी केलेल्या आवाहनावरून ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी उदया दि.28 रोजी उद्या संप घोषीत केला आहे.त्यापार्श्वभुमीवर रुग्णाची गैरसोय टाळण्यासाठी विभागातील निवडक औषध विक्रेत्यांच्या आस्थापना सुरू राहणार आहेत. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तयारी केली असुन पुरेशा प्रमाणात औषध उपलब्ध राहतील. त्यामध्ये नागपूर जिल्हयात 102, वर्धा 9, गडचिरोली 12, चंद्रपूर 38, भंडारा 12 तर गोंदिया 18 औषध विक्रेत्यांची दुकाने सुरू असतील.
औषध विक्रेत्यांच्या संपाचा त्रास रुग्णांना होणार नाही यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र ,जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व शासकीय रुग्णालयांना औषधांचा साठा पुरेश्या प्रमाणात ठेवण्याचे कळवले आहे. या बंद बाबत इंडियन मेडीकल असोशीएशन व इतर डॉकटरांच्या संघटनांनी त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात साठा ठेवावा अश्या सूचना अन्न व औषध प्रशासनाने दिल्या आहेत.
बंदच्या पार्श्वभूमीवर सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालय नविन प्रशासकीय ईमारत क्रमांक 2,पाचवा माळा, बी विंग, जुने सचिवालय परिसर, सिव्हील लाईन्स येथे आपातकालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तिथे 6 अधिकारी व निरीक्षकांच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. त्यांची नावे व संपर्क क्रमांक – सहायक आयुक्त पी.एन.शेंडे 9766454852, औषध निरीक्षक एन.व्ही.लोहकरे -7276544972, औषध निरीक्षक पी.एूम.बल्लाळ - 9423690634, औषध निरीक्षक एस.एच.चव्हाण 7768827527, औषध निरीक्षक श्रीमती मो.वि. धवड 9881680418,औषध निरीक्षक श्रीमती स्वा.सु. भरडे 9890828194 बंदच्या कालावधीत जिल्हयातील कोणत्याही रुग्णास, केव्हाही औषधाची गरज भासल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन सहआयुक्त औैषध प्रशासन डॉ.राकेश तिरपुडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment