Thursday, 29 November 2018

विधानसभा लक्षवेधी : 3 लोकसंख्येच्या आधारावर व राष्ट्रीय मानकाप्रमाणे महापालिकेमार्फत पाणीपुरवठा करणार - डॉ.रणजित पाटील



 मुंबई, दि. 29 : झोपडपट्टी धारकांना होणारा पाणीपुरवठा हा इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांपेक्षा 1/3 प्रमाणात केला जातो. शहर विभागात जलवाहिन्यांचे जाळे जुने असल्याने तेथे पाणी गळतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरामध्ये लोकसंख्येच्या आधारावर व राष्ट्रीय मानकाप्रमाणे पाणी पुरवठा करण्याचा महापालिका सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.
महापालिकेचे हिशोब बाह्य पाण्याचे प्रमाण कमी करण्याचे सुरु आहे. त्यावर उपाययोजना करण्याचे जलवितरण सुधारणा कार्यक्रमांतर्गत सेवा सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये गळती विशेषण ही एक सेवा अंतर्गत असून सेवा सुचनेच्या सल्लागारानुसार हेलीयम वायुच्या तंत्रज्ञानाने गळती शोधण्याची मोहीम पथदर्शी प्रकल्प चालू आहे.
महापालिकेकडील गळती शोधण्याची आधुनिक उपकरणे उपलब्ध असून या माध्यमातून गळती शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. बृन्हमुंबई महालिकेच्या शहर विभागाच्या जलवाहिन्या या 100 जुन्या असून त्या बदलण्याचे काम प्रगती पथावर आहे. जुन्या जलवाहिन्याचे नुतनीकरण व पुनर्वसन करण्याचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला असून  मागील 5 वर्षांमध्ये एकूण 206 किमी लांबीच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. मुंबई शहरास सरासरी 3 हजार 800 दशलक्ष लि. पाण्याचा पुरवठा केला जात असून मुंबई शहराची पाण्याची वाढती गरज भागविण्याकरिता गारगाई, पिंजाळ, दमणगंगा  या स्त्रोतांचा टप्प्याटप्प्यांचा विकास करण्याचे महापालिकामार्फत प्रस्तावित आहे. सदर प्रकल्प 2031 पर्यंत पुर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्प पुर्ण झाल्यास प्रतिदिन 6 द.ल.लि. पाणी उपलब्ध होणार आहे, असेही यावेळी डॉ.रणजित पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.
००००

No comments:

Post a Comment