Thursday, 29 November 2018

विधानसभा लक्षवेधी : 1 सर ज.जी. समूह रुग्णालयात व ग्रॅण्ड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आस्थापनेवरील रिक्त पदे भरणार - वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन



मुंबई दि.29 : मुंबईतील सर ज.जी. समुह रुग्णालयात वर्ग 1 ते वर्ग 4 या संवर्गातील एकूण मंजूर 2 हजार 596 पदांपैकी 2 हजार 268 पदे कार्यरत असून ग्रॅण्ड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे वर्ग 1 ते वर्ग 4 या संवर्गातील एकूण मंजूर 745 पदांपैकी 614 पदे कार्यरत आहेत. रुग्णांना उत्तम सेवा मिळावी यासाठी वरील दोन्हीही आस्थापने वरिल रिक्त पदे भरण्यात येतील असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.
शासन निर्णयानुसार वैद्यकीय संस्थांना लागणारे साहित्य व शल्योपचारासाठी लागणारे साहित्य हाफकीन महामंडळाकडून करणे बंधनकारक आहे. सदर महामंडळाकडून औषधांचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत संचालनालयाच्या दर करारावर व इतर दर करारावर जिवनावश्यक व जीवनरक्षक औषधांची खरेदी करुन औषधांचा पुरवठा करण्यात येतो. तसेच महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या निधीमधून गोरगरीब रुग्णांसाठी पिवळे रेशनकार्डधारक व अंत्योदय योजनेतील रुग्णाकरिता तात्काळ औषधे व उपकरणे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. सर ज.जी समुह रुग्णालय येथील स्वतंत्र संशोधन केंद्र निर्मितीकरिता आणि केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत वन स्टाफ सेंटरच्या उभारणीकरिता पर्याप्त जागा रुग्णालय परिसरात उपलब्ध नसल्याने रुग्णालयाच्या लगत असलेल्या रिचर्डसन ॲण्ड क्रुडास या केंद्रशासन अधिकृत कंपनीची जागा रुग्णालय प्रशासनास हस्तांतरित करणेबाबत संचालनालयाने प्रस्ताव सादर केला असून त्यासाबत कार्यवाही सुरु आहे. सर ज.जी. समूह रुग्णालयात अतिविशेष उपचार रुग्णालय बांधण्यासाठी सुधारित अंदाजपत्रक मान्यता देण्यासंदर्भात शासन सकारात्मक निर्णय घेईल. सर ज.जी.समुह रुग्णालयात सध्या स्थितीत पाच कार्डियाक रुग्णवाहिका कार्यरत आहेत. तसेच कामा व आल्ब्लेस मुंबई यांचे मार्फत 250 खाटांचे कॅन्सर रुग्णालय सुरु करण्याबात प्रस्ताव सादर केला असून या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. महाजन यांनी सांगितले.
००००

No comments:

Post a Comment