मुंबई दि.29 : यवतमाळ येथील मे.चीद्दरवार कन्स्ट्रक्शन
कंपनी यांनी मागासर्वीय 100 मुलांच्या वस्तीगृहाच्या जागेजवळील रस्त्याच्या पलीकडे
खुल्या जागमध्ये रेडी मिक्स प्लांट उभारण्यात आला होता. हे प्लांट उभारताना तयार
करण्यात आलेल्या खोलगट जागेत पावसाळ्यात पाणी साचले. खेळण्यासाठी गेलेले तीन मुले
या खोलगट जागेत बुडाले. सदर खुली जागा महसूल खात्याची असल्याने तहसिलदार केळापूर
यांनी शासकीय जागेवर विनापरवाना उत्खनन केल्याबद्दल कंत्राटदार संजय चीद्दरवार
यांच्यावर 10 लाख 42 हजार 320 इतक्या दंडाची आकारणी करण्यात आली आहे. पांढरकवडा
पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर प्रकरणाचा तपास सुरु आहे.
या गुन्ह्यात लवकरच आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र न्यायप्रविष्ट करण्यात येणार आहे,
असे उद्योग आणि खनिकर्म राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी लक्षवेधीला उत्तर
देताना सांगितले.
सद्यस्थितीत वस्तीगृहाचे बांधकाम संरक्षक
भिंतीसह पूर्ण झाले असून संपूर्ण परिसर सुरक्षित आहे. या परिसरात कोणताही धोकादायक
खड्डा नसून सदर इमारतीचे बांधकाम संबधित खात्यास हस्तांतरीत करण्यात आले आहे. सदर
घटना सप्टेंबर 2018 मध्ये घडली असून ही मागासर्वीय मुलांच्या वसतीगृहाच्या जागेत
नसून इतरत्र घडली आहे. पोलीस विभागामार्फत या घटनेविषयी तपासकाम सुरु असून लवकरच
या घटनेचा अहवाल प्राप्त होईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment