मुंबई, दि. २९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात
नेदरलँडचे मुख्य पोलीस आयुक्त जमील म्यूसेन यांची 'मी
कसा घडलो' या विषयावर मुलाखत घेण्यात आली
आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. ३० नोव्हेंबर रोजी
संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत
पत्रकार धर्मेंद्र झोरे यांनी घेतली आहे.
श्री. जमील म्यूसेन यांनी या मुलाखतीत मुंबईतील डोंगरी च्या चिल्ड्रन एड
सोसायटीतील दिवस, डच पालकांनी दत्तक
घेतल्यानंतरचा प्रवास, त्यांनतर शिक्षण आणि
नोकरीचा अनुभव,सैन्यातील अधिकारी ते पोलीस
आयुक्त पदापर्यंतचा प्रेरणादायी वाटचाल, डोंगरी चिल्ड्रन एड सोसायटीला आपल्या कुटूंब आणि मित्रांसमवेत दिलेली भेट, चिल्ड्रन एड सोसायटीला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी
उचलेले पाऊल या विषयी सविस्तर माहिती श्री. म्यूसेन यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.
*****

No comments:
Post a Comment