Tuesday, 13 November 2018

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

नागपूर,दि.13: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने युवा महोत्सवाचे आयोजन नोव्हेंबरच्या शेवटी करण्यात आले आहे.
सदर महोत्सवात लोकगीत, लोकनृत्य, एकांकिका, या हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असाव्यात. शास्त्रीय वाद्य व गायन , भरतनाटयम, कथ्थक, मनिपुरी, ओडीसी, कुचीपुडी, स्वयंस्फूर्त वक्तव्य हिंदी किंवा इंग्रजीत राहणार आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धक 15 ते 19 वर्ष वयोगटातील असावा. युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय तसेच सांस्कृतिक मंडळ यांनी आपले प्रवेश अर्ज 17 नोव्हेंबर 2018 पूर्वी जन्मतारखेचा दाखला तसेच आधार कार्डसह ते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मानकापुर येथे सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी श्रीमती त्रिवेणी बांते यांच्याशी 9975590232 या दूरध्वनी क्रमांकाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
**** 

No comments:

Post a Comment