Thursday, 29 November 2018

मंत्रालय आवारातील डेब्रीज हटविण्याच्या कामात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणार - प्रवीण पोटे-पाटील


            मुंबई, दि. 29 : मंत्रालय आवारातील डेब्रीज हटविण्याच्या कामासंदर्भात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिकचे मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपासणी अन्वेषण पथक (तांत्रिक) गठीत करण्यात आले असून चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.
            यावेळी श्री. पोटे-पाटील म्हणाले, फेब्रुवारी, 2015 ते मार्च, 2016 या कालावधीत डेब्रीज हटविण्याच्या कामासाठी एकूण 67.69 लाख रुपये अंदाजित किंमतीची 20 कामे हाती घेण्यात आली. या कामांमध्ये प्रसाधनगृह दुरुस्ती व कार्यालयीन दुरुस्तीच्या 35.42 लाख रुपये अंदाजित किंमतीच्या दहा कामांचा समावेश आहे. डेब्रीज वाहतुकीसाठी एकूण 30.14 लाख रुपये खर्च झाला आहे. या डेब्रीज हटविण्याचे काम मजूर सहकारी संस्था तसेच नोंदणीकृत कंत्राटदार यांच्याकडून करुन घेण्यात आले होते.
००००



No comments:

Post a Comment