Saturday, 3 November 2018

दिवाळीच्या काळात प्रादेशिक परिवहन कार्यालय बंद राहील

नागपूर, दि 3 : दिवाळीचा मुख्य दिवस लक्ष्मी पूजन दिनांक 7 नोव्हेंबर असून दिनांक 8 व 9 नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सलग तीन दिवसीय शासकीय अवकाश असण्यासोबतच महिन्याचा दुसरा शनिवार तसेच रविवार असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज पाच दिवस बंद राहील. या कालावधीत विशेष परवाने देण्याचे काम देखील बंद राहणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
                                                                                   *****

No comments:

Post a Comment