Thursday, 27 December 2018

शिक्षकांची राज्यस्तरीय नवोपक्रम ऑनलाईन स्पर्धा पाच गटांत


        नागपूर दि. 27, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत शिक्षकांच्या राज्यस्तरीय नवोपक्रमशिलता आणि सृजनशिलतेला प्रोत्साहन देण्यासाठी यंदा ऑनलाईन नवोपक्रम स्पर्धा पाच गटात आयोजित करण्यात आली आहे.
             ही स्पर्धा सन २०१८-१९ या वर्षी पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांबरोबरच पर्यवेक्षीय अधिकारी, विषय सहायक, विषय साधनव्यक्ती, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अध्यापकाचार्य यांच्यासाठी ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
              ऑनलाईन होत असलेल्या स्पर्धेत सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी नवोपक्रम स्पर्धेची वैशिष्ट्ये, अहवाल लेखन मुद्दे, पात्रतेच्या अटी आणि स्पर्धेचे नियम आदि माहितीसाठी  www.maa.ac.in/innovation2018-19 या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
****

No comments:

Post a Comment