· ४८८ शाळांमध्ये १०० टक्के
लसीकरण
· १७
जानेवारीपर्यंत राबविणार अभियान
नागपूर, दि. 27 : केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे
राबविण्यात येत असलेल्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेला नागपूर जिल्ह्यात उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत
८ लाख ७ हजार ७४१ बालकांना गोवर-रुबेला लसीकरण करण्यात आले
आहे. हे
अभियान १७ जानेवारीपर्यंत राबविण्यात येत असल्याची माहिती आरोग्याकडून
प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली आहे.
शासनातर्फे जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टाच्या
तब्बल ६७ टक्के लक्ष्य पूर्ण करण्यात आले असून, गोवर - रुबेला लसीकरण
मोहिमेसंदर्भांत पालकांनी शंकानिरसनासाठी १०४ या निशुल्क क्रमांकावर संपर्क
साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. नागपूर शहरात मनपाच्या
अखत्यारीत येणारी रुग्णालये, शाळा तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक
आरोग्य केंद्रे,
ग्रामीण
रुग्णालये,
उपकेंद्र
आणि शासकीय व खाजगी शाळांमधून हे अभियान राबविण्यात येत आहे. गोवर
रुबेला आजार हा वेळीच उपचार न झाल्यास घातक ठरु शकतो. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना
ही लस देणे गरजेचे असल्याचे त्यांनी कळविले आहे.
नागपूर शहर व जिल्ह्यात १२ लाख ४ हजार विद्यार्थ्यांना
लसीकरण देण्याचे लक्ष्य ठेवले होते. आतापर्यंत जिल्ह्यात ८ लाख ७ हजार ७४१
बालकांना लसीकरण करण्यात आले आहे. ४८८ शाळांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले असून, येत्या काही
दिवसांमध्ये जिल्ह्यात १०० टक्के अभियान यशस्वीपणे
राबविण्यात
येईल,
असा
विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. पुढील टप्प्यात हे अभियान अंगणवाडी
केंद्रांच्या माध्यमातून राबविण्यात येईल, असेही जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. मिलिंद गणवीर यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment