Thursday, 27 December 2018

इ.बी.सी. आवेदनपत्र तपासणी शिबिराचे १ जानेवारीपासून आयोजन


            नागपूर दि.27, सन २०१८-१९ या वर्षांसाठी इ.बी.सी.आवेदनपत्रे तपासणी शिबिराचे आयोजन १ जानेवारीपासून करण्यात आले आहे. सर्व आवेदनपत्रे संबंधित कर्मचा-यांना शुल्क सवलतीचे अर्ज व अभिलेखासह सकाळी १०.३० वाजता रविनगर येथील लेखाधिकारी शिक्षण विभाग कार्यालयात न चुकता पाठवावेत. शुल्क सवलतीच्या अर्जाची तपासणी प्रथम आपल्या स्तरावर करुनच हे आवेदन पाठविण्यात यावेत. त्रुटी  असलेले अर्ज, अपूर्ण अर्ज नामंजूर करण्यात येतील. एकदा नामंजूर केलेल्या अर्जाव्र पुन्हा विचार केला जाणार नाही. त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी शाळा महाविद्यालयांची राहील. विहित मुदतीनंतर सादर केलेल अर्ज तपासण्यात येणार नाहीत, असे शिक्षण विभागाचे लेखाधिकारी र. पं. गिरी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
*****

No comments:

Post a Comment