लोकसभा निवडणूक-2019मुंबई, दि. 27 : लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघातील नामनिर्देशन पत्रांची काल छाननी झाली. छाननीमध्ये 147 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली.पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत 184 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. छाननीअंती लोकसभा मतदार संघ निहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : वर्धा लोकसभा मतदार संघात 16, रामटेक मतदार संघात 21, नागपूर मतदार संघात 33, भंडारा-गोंदिया मतदार संघ- 23, गडचिरोली- चिमूर मतदार संघात 6, चंद्रपूर मतदार संघात 17 आणि यवतमाळ- वाशीम मतदार संघात 31 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली.नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची मुदत उद्या दि. 28 मार्च 2019 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असून त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.००००
Wednesday, 27 March 2019
छाननीमध्ये पहिल्या टप्प्यातील 147 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment