Wednesday, 20 November 2019

शासकीय ग्रंथालयास असमान निधी योजनेसाठी 11 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव आमंत्रित


नागपूर, दि. 20: राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता अंतर्गत शासकीय ग्रंथालयास असमान निधी योजनेतून अर्थसहाय्य देण्यात येते. असमान निधी योजना 2019-20 अंतर्गत शासकीय ग्रंथालयांनी निधीच्या मागणीकरिता दिनांक 11 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी गजानन कुरवाडे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानाच्या सहकार्याने शासकीय सार्वजनिक ग्रंथालयांना कार्यान्वीत करण्यासाठी असमान निधी तसेच सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्तार-बांधणीसाठी अर्थसहाय्य योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी आपणास आवश्यक असलेल्या असमान निधी योजनेचे प्रस्ताव www.rrrlf.nic.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन दिलेल्या सुचनांनुसार ऑनलाईन पध्दतीने दिनांक 7 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत भरावेत. त्यानंतर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे आवश्यक कागदपत्रासह इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील सदर प्रस्ताव दिनांक 11 डिसेंबरपर्यंत सादर करावेत.
असमान निधी योजनेअंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामुग्री, फर्निचर, इमारत बांधकाम तसेच इमारत विस्तारासाठी असमान निधीतून अर्थ सहाय्य पुरविल्या जाते. त्याचप्रमाणे ‘राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा’ विकसित करणे, महोत्सवी वर्षे सादर करणे, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजन करणे तसेच बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरिता अर्थ सहाय्य पुरविल्या जाते.
अधिक माहितीसाठी कार्यालयाचे संकेतस्थळ www.rrrlf.nic.in वर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी गजानन कुरवाडे यांनी केले आहे.
*****

No comments:

Post a Comment