नागपूर दि. 20: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने नागपूर येथे मशरूम फार्म प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 22 ते 24 नोव्हेंबर 2019 या कालावधीत एम.सी.ई.डी., उद्योग भवन, पहिला माळा, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001 येथे करण्यात आले आहे.
‘आधुनिक मशरूम फार्म’च्या प्रशिक्षणाव्दारे स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या उद्योजकीय बाबींची माहिती मिळून प्रशिक्षणार्थी स्वयंरोजगार सुरु करू शकेल. या प्रशिक्षणामध्ये मशरूमची लागवड, योग्य ऋतू, त्यांचे प्रकार, खाण्यायोग्य मशरूम, मशरूमच्या शेतीसाठी लागणारा कच्चा माल, वातावरण नियंत्रण तसेच स्वयंरोजगार कसा सुरु करावा, कर्ज विषयक योजनांची माहिती, विक्री व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे आदींबाबत माहिती देण्यात येणार आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थींनी अधिक माहितीसाठी एम.सी.ई.डी., उद्योग भवन, पहिला माळा,सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001 येथील कार्यक्रम समन्वयक श्रीमती अश्विनी शेंडे (भ्रमणध्वनी क्रमांक- 7498769824) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन एम.सी.ई.डी चे प्रकल्प अधिकारी यांनी दिली आहे.
**********
No comments:
Post a Comment