नागपूर,दि.20: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम मंगळवार, दिनांक 26 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. हे प्रशिक्षण उद्योग भवन, पहिला माळा, सिव्हिल लाईन्स येथे आयोजित करण्यात आला असून, ते 11 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
            उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग सुरु करण्याची संधी प्रक्रिया, उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, उद्योजकीय गुणसंपदा, प्रकल्प निवड प्रक्रिया, प्रकल्प अहवाल तयार करणे, बाजारपेठेचे व्यवस्थापन, शासकीय व निमशासकीय कर्ज योजनांची माहिती, उद्योग व्यवस्थापन, उद्योगांना प्रत्यक्ष भेटी इत्यादी विषयावर तज्ज्ञ, अनुभवी व्यक्ती, अधिकाऱ्यांद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल.
            या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या प्रवेशाकरिता उद्योग सुरु करु इच्छिणारे युवक-युवतींनी अधिक माहितीसाठी  कार्यालयीन वेळेत अश्विनी शेंडे (7498769824) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी एच.आर. वाघमारे यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment