Wednesday, 20 November 2019

केंद्रीय पथक घेणार विदर्भातील नुकसानीचा आढावा


  • कृषी आणि शेतकरी विभागाचे केंद्रीय संचालक डॉ. आर.पी. सिंह करणार पाहणी  
नागपूर,दि.20 : राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीतील शेतपिकांचे नुकसान पाहण्यासाठी पाचही विभागामध्ये केंद्रीय पथक  तीन दिवसीय पाहणी दौरा करुन आढावा घेणार आहे.
यामध्ये नागपूर आणि अमरावती विभागाचा नुकसान पाहणी दौरा कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर.पी.सिंह हे शुक्रवार दिनांक 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान आढावा घेणार आहेत. हे केंद्रीय पथक विभागातील सर्व जिल्ह्यातील अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागात भेट देणार आहे,  अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडून प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
***** 

No comments:

Post a Comment