Tuesday, 19 November 2019

सृष्टी मित्र पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

नागपूर, दि.19 :  पर्यावरणपूरक तसेच पर्यावरण संवर्धन विषयक कृती उपक्रम व जाणीव जागृतीसाठी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी सन 2019-20 साठी शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना सृष्टी मित्र पुरस्कार पर्यावरण विभाग आणि पर्यावरण शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सृष्टी मित्र पुरस्कार 2019-20 साठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. 
    सृष्टी मित्र पुरस्कार हा राज्यस्तरीय पर्यावरण पुरस्कार म्हणून ओळखला जातो. सृष्टी मित्र पुरस्कारांची सुरुवात ही महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षी म्हणजेच 2010 मध्ये झाली असून पुरस्कारांची ही पाचवी आवृत्ती आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, लेखक, कवी, छायाचित्रकार, व्यंगचित्रकार, तज्ज्ञ, शिक्षक महिला आणि इतर नागरिकांना पर्यावरण संवर्धन विषयक कृती उपक्रमातील आपले कौशल्य, सर्जनशीलता आणि नवीन कल्पना मांडता याव्यात म्हणून सृष्टी मित्र पुरस्काराचे आयोजन आहे. 
स्थानिक पर्यावरणीय समस्यांना ओळखून राबविलेल्या प्रयत्नांचा तपशील विद्यार्थी आणि नागरिक प्रवेशिका सादर करु शकतात. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2019 ही आहे. अधिक माहितीसाठी वेबसाईट smawards.in भेट द्यावी व नोंदणी करावी आणि फेसबुक पेज www.facebook.com/smawards ला लाईक करावे, असे आवाहन पर्यावरण विभाग आणि पर्यावरण शिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
*******

No comments:

Post a Comment