Friday, 17 January 2020

पत्रकारिता पुरस्कारासाठी 31 पर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन



         नागपूर, दि. 17 : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क  महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट  लेखन  आणि उत्कृष्ट  दूरचित्रवाणी, वृत्तकथा, उत्कृष्ट  छायाचित्रकार  पुरस्कार, सोशल मीडिया  पुरस्कार, स्वच्छ  महाराष्ट्र जनजागृती  पुरस्कार  स्पर्धा   जाहीर करण्यात आली आहे. 1 जानेवारी  2019 ते   31 डिसेंबर 2019 पर्यंतच्या  कालावधीसाठी या स्पर्धेसाठी प्रवेशिका  मागविण्यात  येत आहेत. प्रवेशिका  पाठविण्याची  अंतिम  मुदत  31 जानेवारी 2020 अशी राहील. उत्कृष्ट  पत्रकारिता पुरस्कार-2019 साठी माहिती पत्रक/अर्जाचे नमुने www.dgipr.maharashtra.gov.in    या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पुरस्कारासाठी  पत्रकारांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात आले आहे.
                                                       ****

1 comment: