Monday, 27 January 2020

नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे नागपूर दौऱ्यावर



        नागपूर, दि. 27: नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे उद्या, मंगळवार (दिनांक 28) रोजी सकाळी 9 वाजता नागपूर विमानतळावर येतील. त्यानंतर त्यांचे विमानतळावरुन रविभवनकडे प्रयाण होईल. सकाळी 10.15 वाजता ते नागपूर मेट्रो ॲक्वा लाईनच्या लोकमान्यनगर  ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रोच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात  नियोजित सन 2020-21 जिल्हा वार्षिक योजनांतर्गत गडचिरोली जिल्हा नियोजन बैठकीस  उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता नागपूर विमानतळावरुन ते मुंबईकडे प्रयाण करतील.
*****

No comments:

Post a Comment