नागपूर, दि. 17 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा
माहिती केंद्रातर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रीय विचार’ या विषयावर
खुली निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.
निबंधाची
शब्द मर्यादा एक हजार शब्द असून विजेत्या स्पर्धकांना पहिले पारितोषिक रुपये 700, दुसरे पारितोषिक
रुपये 500, तिसरे पारितोषिक रुपये 300 देण्यात येणार आहे. तर दोन
प्रोत्साहनपर पारितोषिके 101 रुपये आणि
सर्व स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.
इच्छुक
स्पर्धकांनी आपले निबंध दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा
माहिती अधिकारी, विभागीय माहिती केंद्र, सुपर मार्केट बिल्डिंग, पहिला माळा,
सीताबर्डी, नागपूर येथे सादर करावे. तसेच 31 मार्चनंतर आलेल्या निबंधांचा विचार
करण्यात येणार नाही याची संबंधितांनी नोंद
घ्यावी. असे आवाहन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे यांनी केले आहे.
14 एप्रिल 2020 रोजी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या
स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात येईल, असे जिल्हा माहिती अधिकारी शैलजा
वाघ-दांदळे यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment