Tuesday, 17 March 2020

जात पडताळणीच्या त्रुटीपूर्ततेसाठीचे विशेष अभियान रद्द



नागपूर, दि. 17 : विज्ञान, व्यावसायिक शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या सर्व प्रवर्गातील अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणे समितीकडे सादर केले आहेत. परंतु बऱ्याचशा अर्जदारांच्या प्रकरणामध्ये संपूर्ण मूळ कागदपत्र न दाखविल्याने, निवासी पुरावा व इतर जाती दावा सिद्ध करणारे पुरावे सादर न केल्याने प्रलंबित आहेत. अशा अर्जदारांना एस. एम. एस. तसेच पत्राद्वारे वारंवार सूचना देवूनही संबंधित अर्जदारांनी  त्रुटीबाबत पूर्तता  केली नाही. अशा अर्जदारांना विशेष अभियानाद्वारे त्रुटीपूर्तता करण्यासाठी दिनांक 26 व 27 मार्च 2020 रोजी अंतिम संधी देण्याचे पत्र, एस. एम. एस. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून देण्यात आले आहे.
राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 13 मार्च पासून लागू करण्यात आला असून जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये कलम 144 नुसार जमावबंदी आदेश निर्गमित केला आहे.
त्यानुषंगाने दिनांक 26 व 27 मार्च रोजी  विशेष अभियनाद्वारे त्रुटीपूर्ततेसाठी घेण्यात येणारे विशेष अभियान  जमाव बंदी कायद्यानुसार रद्द करण्यात आले असून संबंधित अर्जदारांनी व पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव,   ए. आर. रामटेके यांनी केले आहे.
*****

No comments:

Post a Comment