नागपूर, दि. 16 : चहा, कॉफी, दुध या पेयांशिवाय सर्वसामान्य नागरिकांची
सकाळ साजरी होवू शकत नाही. दुधाचे आगमन झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने स्वयंपाकघरातील कार्यवाही सुरु होत असते.
परंतु लॉकडाऊनच्या कालावधीतही शहरातील नागरिकांना दुधाचा होणारा पुरवठा बाधित
झालेला नाही. कोरोना साथीचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी प्रशासनाच्या
तत्पर कार्यवाहीमुळे शहरात दुधाचा पुरेसा व अखंडित पुरवठा होत आहे.
कोरोना किंवा कोणत्याही विषाणूजन्य आजाराला
रोखण्यासाठी ‘प्रतिकार शक्ती’ ही महत्त्वपूर्ण. यासाठी दुध तसेच दुग्धजन्य
पदार्थ्यांचे नियमित सेवन करणे आवश्यक आहे. शुद्ध दुध तर लहानग्यांसाठी वरदान आहे.
यासाठी प्रत्येकाच्या आहारात दुधाची ठराविक मात्रा असणे आवश्यक आहे. दुधाचे नियमित
सेवन नागरिकांसाठी आवश्यकच आहेच. त्यामुळे जनतेने दैनंदिन आहारात दुधाचा वापर
वाढवावा असे आवाहन दुग्ध
विकास मंत्री सुनिल केदार यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दुधाचा वापर
काहीसा कमी होत असल्यामुळे दुध संकलित करणाऱ्या संस्थाकडून दुधाची खरेदी पुर्वीप्रमाणे होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे
शेतकरी व दुध उत्पादक अडचणीत येत आहेत. यासाठी जिल्ह्यातील खेडयापाडयापासून सर्व ठिकाणांहून दुध संकलित करून
त्याचे योग्य वितरण झाल्यानंतर उरलेल्या दुधापासून भुकटी बनविण्याला प्राधान्य
देण्याबाबतचे निर्देश दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार यांनी नुकतेच दिले आहेत.
प्रादेशिक दुग्ध व्यवसाय
विभागात दररोज जिल्हानिहाय संकलित होणाऱ्या तसेच वितरित होणाऱ्या दुधाची माहिती
संकलित केली जाते. त्यानुसार नागपूर विभागात सर्वात जास्त दुध भंडारा जिल्हृयातून
संकलित केले जाते. नागपूर विभागात एका दिवसात जवळपास 6 लाख 12 हजार 337 लीटर दुध संकलित केले जाते. आणि जवळपास
अंदाजे 2
लाख
38
हजार
463
लीटर
दुध वितरित होते. शिल्लक राहिलेल्या दुधापासून दुधाची भुकटी तसेच दुग्धजन्य पदार्थ बनविले जातात. नागपूर
जिल्हृयात दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून संकलन होणारे दुध ग्राहकांपर्यंत
पोहचविल्यानंतर पहिल्यांदाच मदर डेअरीच्या माध्यमातून दिल्ली ,हैद्राबाद
येथे दुग्धजन्य पदार्थासह भुकटी तयार करण्यासाठी पाठविल्या जात आहे. लॉकडाऊनच्या
कालावधीत दुधाचा पुरवठा सुरळीत होत असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
आहे.
*******
No comments:
Post a Comment