नागपूर, दि. 18 : लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापना पूर्ववत सुरु करताना आवश्यकतेनुसार
लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी 24 जूनपासून ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे.
जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र
आणि जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित हा व्हर्च्युअल मेळावा 24 ते 26 जूनदरम्यान चालणार
आहे. त्यात जिल्ह्यातील गरजू बेरोजगार युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले
आहे. औद्योगिक आस्थापनांनी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची व रिक्त पदांची नोंदणी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित करणे आवश्यक असून, त्रैमासिक विविरणपत्रे
सादर करणे उद्योजकांवर बंधनकारक आहे.
तसेच गरजू
उमेदवारांनीही महास्वयंम ॲप डाऊनलोड करुन त्यात नावनोंदणी करावी. त्यामुळे औद्योगिक
आस्थापनांना आवश्यक आणि रिक्त पदांचा शोध घेणे सोईचे आणि सुलभ होणार असल्याचे जिल्हाधिकारी
श्री. ठाकरे यांनी कळविले आहे.
******
No comments:
Post a Comment