Thursday 29 October 2020

 भविष्य निर्वाह निधीचे वर्ष 2019-20 चे वार्षिक विवरणपत्र सेवार्थ प्रणालीवर  

नागपूर, दि. 29:- नागपूर भविष्य निर्वाह निधी लेख्याचे वर्ष 2019-20 साठी वार्षिक विवरण महालेखाकार नागपूर-2 च्या संकेतस्थळ तथा सेवार्थ  पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे. हे विवरणपत्र कर्मचारी ऑनलाईन पाहू शकणार आहेत, असे वरिष्ठ उपमहालेखाकार यांनी कळविले आहे.

   विदर्भ आणि मराठवाडा विभागात कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी लेखा महालेखाकार-2 नागपूर कार्यालयामध्ये ठेवले जातात. त्यामुळे कर्मचा-यांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधी लेख्यांचे वार्षिक विवरण महालेखाकार नागपूर-2 च्या <HTTP:// agmaha.cag.gov.in/GPFNagv1.asp या संकेतस्थळावर पाहू शकतात.

शासनाच्या 17 मे 2019 च्या अधिसूचनेनुसार सर्व कर्मचाऱ्यांनी मोबाईल क्रमांक या कार्यालयाच्या gpfmobileregister@gmail.com  या ई-मेल पत्यावर पाठवावा किंवा 9423441755 या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवून नोंदणीकृत करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आपले नाव व जन्म तारीख भविष्य निर्वाह निधी विवरण पत्र तसेच सेवार्थ प्रणालीमध्ये तपासून घ्यावे, तफावत असल्यास आपले नाव व जन्म तारीख सेवार्थ प्रणालीमध्ये सुधारित करुन संबंधित आहरण व संवितरण अधिका-यामार्फत नाव व जन्म तारीख या कार्यालयाच्या अभिलेख्यामध्ये पडताळणी करुन घ्यावी. नाव, जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ आयडी सह gpftakrarngp@gmail.com वर ईमेल पाठवावा किंवा फॅक्स क्रमांक 0712-2560484 वर सूचित करण्याचे सूचित करण्यात आले आहे.   

*****
    

No comments:

Post a Comment