Tuesday 27 October 2020

                                    शालांत प्रमाणपत्र परीक्षा नोव्हें- डिसेंबरमध्ये

 नागपुर, दि. 27:- शालांत प्रमाणपत्र परीक्षा नोव्हेंबर - डिसेंबर 2020 च्या परीक्षेला बसणाऱ्या विज्ञान व तंत्रज्ञान, पूर्व व्यावसायिक विषयांची प्रात्यक्षिक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विषय योजनेतील कार्यानुभव विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत.

18 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 या कालावधीत प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा, तंत्र व पूर्व व्यावसायिक विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा, नवीन पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे.

      तसेच 7 ते 12 डिसेंबरदरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण, कार्यानुभवाची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा होणार असली तरीही विद्यार्थी संख्येनुसार केंद्रांनी त्यांच्या स्तरावरुन आयोजित करावी, तसेच परीक्षार्थींना वेळोवेळी परीक्षेबाबतची माहिती देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच परीक्षेशी संबंधित पत्रव्यवहार हा विनाविलंब करावा. पत्रव्यवहार व साहित्य पाठविण्यास विलंब झाल्यास विलंब शुल्क भरावे लागेल, अशा सूचना त्यांनी सर्व माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य निर्धारित दिनांकास मंडळ कार्यालयात जमा करण्याचे मुख्याध्यापकांना निर्देश विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी  प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहेत.  

 

नागपूर विभागातील प्रवेशपत्रांची संकलन केंद्रे

  नोव्हेंबर व डिसेंबर 2020 या कालावधीत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा 18 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र प्रात्यक्षिक परीक्षा या विषय गटातील लघुलेखन 18 नोव्हेंबर 2020 आणि 19 नोव्हेंबर या तारखेला आयोजित करण्यात येणार आहे.

लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय भंडारा, नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली, जिल्हा परिषद ज्युबिली कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नागभिड जिल्हा चंद्रपूर, नागपूर विभागीय मंडळ कार्यालय नागपूर, न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय वर्धा, शिवाजी विज्ञान महाविद्यालय गडचिरोली, धर्मराव विद्यालय आलापल्ली, हितकारणी विद्यालय आरमोरी आणि गुजराती नॅशनल कनिष्ठ महाविद्यालय  गोंदिया अशी प्रवेशपत्र संकलन केंद्र  आहेत.   

 परीक्षेचा कालावधी कमी असल्याने यावेळी प्रात्यक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षा ऑऊट ऑफ टर्न ने आयोजित करता येणार नाही, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.   

00000

No comments:

Post a Comment