नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ केंद्राबाबत हरकती व सूचना आमंत्रित
नागपूर दि. 05 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेसाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून नागपूर विभाग मतदारसंघासाठी दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान घेण्यात येत आहे. त्यानुसार नागपूर विभाग पदविधर मतदार संघाच्या मतदान केंद्राची प्रारुप यादी 4 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे प्रसिध्द करण्यात आलेली आहे. मतदान केंद्राबाबत आक्षेप किंवा सूचना असल्यास 10 नोव्हेंबर 2020 रोजी 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी नागपूर तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी, नागपूर विभाग पदविधर मतदार संघ यांचे कार्यालयात सादर करता येईल, असे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे़ यांनी कळविले आहे.
सदर मतदान केंद्राची यादी नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या सहाही जिल्हयात तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयात उपलब्ध आहेत.
00000
No comments:
Post a Comment