नागपूर, दि. 06 : शिस्तबद्ध पथसंचलन, राखीव दलाच्या बँडपथकाचे सुरेल व तालबद्ध सादरीकरण आणि सर्वांचे आकर्षण ठरलेली हर्ष फायर परेड अशा एका पेक्षा एक सरस सादरीकरणाद्वारे राज्य राखील पोलीस बलाचा 76वा वर्धापन दिन आज येथील गडचिरोली कॅम्प उपमुख्यालयात सहसंचालक लेखा व कोषागारे ज्योती भोंडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी राखीव पोलीस बलाचे समादेशक श्री अमोल गायकवाड, समादेशक सहाय्यक एल. आर मिश्रा, पोलीस निरीक्षक आर. के. डवरे, ए. एल तिवारी, पी. आर. डाबेराव, पोलीस अधिकारी यांच्यासह अंमलदार उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्रीमती भोंडे म्हणाल्या, राज्य राखीव पोलीस बलाचे जवान कुटुंबांपासून दूर राहून राज्यात कायदा व सुवस्था अबाधीत ठेवण्यासाठी सतत कर्तव्यावर असतात. गडचिरोलीसारख्या नलक्षग्रस्त भागात सेवा देतात. महाराष्ट्र राखीव पोलीस बल हे देशातील सर्वात मोठ्या पोलीस बलापैकी एक असून उत्तम कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
तत्पूर्वी उत्साहाच्या वातावरणात कवायत मैदानावर हर्ष फायर परेड झाली. परेडचे नेतृत्व पोलीस निरीक्षक आर. के. डवरे यांनी केले. तसेच पोलीस निरीक्षक ए. एस तिवारी आणि पी. आर. डाबेराव यांचा यात सहभाग होता. वर्धापनादिनानिमीत्त राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात दिनांक 6 ते 12 मार्च 2025 या कालावधीत हर्ष फायर परेड, शस्त्र प्रदर्शन, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर, वाहतूक सुरक्षा मार्गदर्शन, जमाव विसंजन सराव, वाद्यवृंद पथकाचे सादरीकरण प्रदर्शनी व वृक्षारोपन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक समादेशक एस. टी. पांडे यांनी तर आभार समादेशन सहाय्यक एल. आर. मिश्रा यांनी केले मानले.
00000


No comments:
Post a Comment