Monday, 8 September 2025

विभागीय लोकशाही दिनात एकही अर्ज प्रलंबित नाही

 


         नागपूर, दि. 8 :  विभागीय आयुक्तालयात आज आयोजित विभागीय व महिला लोकशाही दिनामध्ये एकही प्रकरण प्राप्त झाले नसून यापुर्वीच्या लोकशाही दिनातील कोणतेही प्रकरण प्रलंबित नाही.

 अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) तेजुसिंग पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित लोकशाही दिनात विभागीय उपायुक्त महिला व बालविकास, शहर व ग्रामीण पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नागपूर सुधार प्रन्यास, महानगरपालिका, आदिवासी विकास विभाग, कृषी विभाग, वस्तू व सेवा कर, कामगार विभाग, जिल्हा परिषद, अपर राज्यकर आयुक्त, मुख्य वनरसंक्षक आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

 


No comments:

Post a Comment