नागपूर,दि. 16 : मक्का पिकावर
ढगाळ वातावरणाचा परिणाम होत असून त्यामुळे नवीन लष्करी अळीचा प्रादूर्भाव होत आहे.
त्यापासून पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कृषी
विभागाने लष्करी अळीच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे या संदर्भात
अधिक माहिती दिली आहे.
लष्करी अळया पाने खाऊन पिकाचे नुकसान करतात. अंडयातून
बाहेर आलेल्या अळया पानाचा हिरवा पापूद्रा खातात त्यामुळे पानाला पांढरे चट्टे पडतात.
अळया मक्याच्या पोंग्यामध्ये राहून पानाला छिद्रे करतात. त्यामुळे पोंग्यातून बाहेर
आलेल्या पानावर एका रेषेत एकसमान छिद्रे दिसतात. जूनी पाने मोठया प्रमाणात पर्णहीन
होवून पानाच्या फक्त मध्यशिरा व झाडाचे मुख्य खोड शिल्लक राहते. झाड फाटल्यासारखे दिसते
पोंगा धरण्याची सुरुवातीची अवस्था प्रादुर्भावास कमी बळी पडते पण मध्यम पोंगे अवस्था
त्यापेक्षा जास्त तर उशीरा पोंगे अवस्था अळीला सर्वात जास्त बळी पडते. अळी काही वेळा
कणसाच्या बाजुने आवरणाला छिद्र करुन दाणे खाते.
नवीन लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी पीक उगवणीनंतर रोपे ते सुरुवातीची पोंगे
अवस्था म्हणजेच 3 ते 4 आठवडयांनी
5 टक्के प्रादुर्भाव ग्रस्त झाडे आढळल्यास फवारणी करावी. मध्यम ते उशिरा पोंगे अवस्था
म्हणजेच 5 ते 7 आठवडयांनी 10 टक्के पोंग्यामध्ये प्रादुर्भाव तर उशिरा अवस्थेमध्ये
20 टक्के पोंग्यामधे प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी. गोंडा ते रेशीम अवस्था म्हणजे
8 आठवडयांनी फवारणीची गरज नाही परंतू 10 टक्के कणसामध्ये प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी
करावी.
बिजप्रक्रिया
केली नसल्यास या किडीच्या व्यवस्थापनाकरिता उगवणीनंतर 12 ते 15 दिवसांनी फवारणीसाठी
क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल 9.3 टक्के प्रवाही आणि
ल्यॅब्डा सायहेलोथ्रिन 4.6 टक्के झेडसी प्रवाही 5 मिली किंवा स्पिनेटोराम 11.7 टक्के
एससी प्रवाही 5.12 मिली किंवा क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही एससी, 4.32
मिली किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट 5 टक्के एसजी, 8 ग्रॅम किंवा इमामेक्टीन बेंझोएट
5 टक्के आणि ल्युफेनुरॉन 40 टक्के डब्ल्युजी, 1.6 ग्रॅम किंवा थायोडिकार्ब 75 टक्के
डब्ल्युपी, 20 ग्रॅम किंवा नोव्हाल्युरॉन 5.25 टक्के आणि इमामेक्टीन
बेन्झोएट 0.9 टक्के प्रवाही एससी, 30 मिली प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. चाऱ्यासाठी घेतलेल्या मका पिकावर कुठल्याही प्रकारच्या
रासायनिक किटकनाशकाची फवारणी करु नये त्याऐवजी जैविक किटकनाशकाचा वापर करावा.
अंडयाची
उबवण क्षमता कमी करण्यासाठी व सुक्ष्म अळयांच्या नियंत्रणाकरिता 5 टक्के प्रादुर्भाव
असल्यास 5 टक्के निबोंळी अर्क किंवा ॲझडिरेक्टीन 1500 पीपीएम, 50 मिली प्रति 10 लिटर
याप्रमाणे फवारणी करावी. सुरवातीस अळी पानातील हरीत लवक खावून पानावर पांढरे, लांबट
पट्टे किंवा ठिपके दिसताच बॅसीलस थूरीजींअसीस व कुर्सटाकी 20 ग्रॅम किंवा 10 लिटर पाणी
किंवा 400 ग्रॅम किंवा एकर जैविक किटकनाशकांची फवारणी करावी. पतंग मोठया प्रमाणापर
नष्ट करण्यासाठी कामगंध सापळयांचा एकरी 15 याप्रमाणे वापर करावा. सापळे पिकाच्या घेराच्या
उंचिबरोबर प्राधान्याने सुरुवातीच्या पोंगे असवस्थेत लावावे. पिकाच्या सुरुवातीच्या
अवस्थेत एकरी 20 याप्रमाणे पक्षी थांबे उभारावे तसेच पानावरील अळया असलेल्या प्रादुर्भाव
ग्रस्तपाने (पांढरे चट्टे असलेली) अंडी किंवा अळयांसहित नष्ट करावी व प्रादुर्भावग्रस्त
पोंग्यामध्ये सुकलेली वाळू टाकावी, असे कृषी विभागाकडून सांगण्यात
आले आहे.
000000
No comments:
Post a Comment